• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला; नांगरे पाटलांनी घडवली माय-लेकरांची भेट
  • VIDEO: परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला; नांगरे पाटलांनी घडवली माय-लेकरांची भेट

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 10:06 AM IST | Updated On: Apr 2, 2019 10:06 AM IST

    नाशिक, 2 एप्रिल : तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून घर सोडलेल्या एका 61 वर्षीय माउलीची आणि तिच्या दोन लेकरांची विश्वास नांगरे पाटलांनी भेट घडवून आणली. प्रमिला पवार नामक या माऊलीचा शोध घेण्यासाठी तिची दोन्ही मुले वणवण भटकंती करत होते. रेल्वेस्थानकांवर दिवस-रात्र काढणाऱ्या प्रमिलाबाईंची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान ''माझा एक मुलगा पीएसआय आहे, तर दुसरा कंडक्टर,'' असं सांगणारा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर एक दिवस अचानक त्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीबाहेर येऊन बसल्या. विचारणा केल्यानंतर सत्य बाहेर आलं. त्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ''परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला,'' असं म्हणत माय-लेकरांची भेट घडवून आणली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading