Home /News /maharashtra /

नाशिकमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान?

नाशिकमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान?

नाशिकमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिक, 18 मार्च : कोरोना व्हायरसच्या हाहाकारानंतर इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्ये अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र याच अघोषित बंदचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या भद्रकाली भागातील अनेक ठिकाणी बिनधास्त अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये सट्टा, मटका आणि जुगाराचाही समावेश आहे. व्हिडिओ गल्लीतील सगळे पार्लर बंद असून फक्त जुगार सुरू आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. खोका मार्केट, कत्तल खाना येथील अवैध धंद्यांवर अलोट गर्दी होत आहे. असं चित्र स्पष्टपणे समोर आल्यानंतर जे आम्हाला दिसतं ते पोलिसांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान की पोलिसांचाच आशीर्वाद? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष प्रयत्न करत एक मोहीम राबवली होती. तसंच नागरिकांनी गुन्हेगारीबाबत सतर्क राहून पोलिसांना याबाबत माहिती देण्याची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांना नाशिकमधील जे अवैध धंदे दिसत आहेत, ते पोलिसांना दिसत नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा- भारत कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू होणार, तज्ज्ञ डॉक्टरचा दावापोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळेच हे धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे हे एकप्रकार विश्वास नांगेर पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nashik, Vishwas nangare patil

पुढील बातम्या