लढत विधानसभेची : नाशिक मध्य मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

लढत विधानसभेची : नाशिक मध्य मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

नाशिक मध्य मतदारसंघात आधी मनसेत असलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार वसंत गिते हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण फरांदे आणि गीते गट एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी सक्रिय आहेत.

  • Share this:

नाशिक, 17 सप्टेंबर : नाशिक मध्य मतदारसंघात आधी मनसेत असलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार वसंत गिते हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण फरांदे आणि गीते गट एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी सक्रिय आहेत.

सध्या या मतदारसंघावर भाजपचंच वर्चस्व आहे. माजी उपमहापौर देवयानी फरांदे 2014 मध्ये या मतदारसंघातून तब्बल 61 हजार मतांनी निवडून आल्या. भाजपला असणारं अनुकुल वातावरण, लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार हेमंत गोडसेंना मिळालेली 94 हजार मतं आणि भाजपमध्ये सुरु असलेलं इनकमिंग पाहता भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढतेय.

मागच्या निवडणुकीत देवयानी फरांदे यांनी बाजी मारली आणि तिकीट मिळवलं. पण यावेळी त्यांच्या स्पर्धकांची संख्या वाढली आहे. माजी मंत्री डी. एस. आहेर यांची पुतणी हिमगौरी आडके याही तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव

एकेकाळी शिवसेनेचा चेहरा बनलेले सुनील बागुल आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपत दाखल झालेत. त्यांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर शिवसेनाही इथे उमेदवार ठरवण्यासाठी चाचपणी करतेय. शिवसेनेकडून अजय बोरस्ते, विनायक पांडे, सचिन मराठे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस इथे समीर भुजबळ किंवा शेफाली भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी करतं आहे. समीर भुजबळ यांनी लोकसभा न लढता नाशिक मध्य मधून आमदारकीला उभं राहावं, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती.

लढत विधानसभेची : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदेंना आव्हान कुणाचं?

या मतदारसंघात मुस्लीम आणि दलितांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव इथे पाहायला मिळेल. वंचितचा उमेदवार कोण याबदद्ल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. वंचितची उमेदवारी संजय साबळे यांच्याकडे जाऊ शकते.

नाशिकमध्ये 2009 साली वसंत गीते मनसेचे आमदार झाले होते. आता ते भाजपत आहेत. या निवडणुकीत मनसे आघाडीमध्ये सामील झाली नाही तर माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मनसेची उमेदवारी मिळू शकते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

प्रा.देवयानी फरांदे (भाजप) -६१५४८

वसंत गिते - (मनसे) -३३२७६

अजय बोरस्ते - (शिवसेना ) -२४५४९

शाहू खैरे - (काँग्रेस) - २६३९३

विनायक खैरे- राष्ट्रवादी काँग्रेस)- ७०९५

लढत विधानसभेची : कणकवलीचा गड नितेश राणे राखणार का?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मधलं मतदान

हेमंत गोडसे- (शिवसेना )-९४ हजार ४२९

समीर भुजबळ- राष्ट्रवादी काँग्रेस) -५६ हजार ४५९

पवन पवार -( वंचित आघाडी) -१५ हजार ४०५

माणिकराव कोकाटे-( अपक्ष)- ६६६६

=============================================================================================

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

First published: September 17, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading