नाशिकच्या एटीएममधून निघाले पाच पट पैसे, 5 तासात काढले 2 लाख 68 हजार

नाशिकच्या एटीएममधून निघाले पाच पट पैसे, 5 तासात काढले 2 लाख 68 हजार

काही तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून पाच पट पैसे निघत होते. म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये काढायचे असतील तर ग्राहकाला पाच हजार मिळत होते.

  • Share this:

नाशिक, 18 जून :तुम्हाला पैसे हवे असतात, तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाता, हवे तेवढे पैसे काढता. पण हेच पैसे पाचपट मिळाले तर? नाशिकमध्ये अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये असंच घडलं. काही तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून पाच पट पैसे निघत होते. म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये काढायचे असतील तर ग्राहकाला पाच हजार मिळत होते.

त्यामुळे झालं असं की अवघ्या 5 तासात ग्राहकांनी 2 लाख 68 हजार रुपये काढले. कारण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग नागरिकांनी एटीएमकडे धाव घेतली आणि पहाटेपर्यंत  पैसे काढणं  सुरू होते.1 काहींच्या खात्यात तर पैसे नसतानाही  5 पट पैसे मिळाले.

तांत्रिक बिघाडामुळे हे झालं असल्याचं बँकेनं सांगितलं. ज्या ग्राहकांना पाच पट पैसे मिळाले, त्यांच्या खात्यातून बँक काढून घेणार, असंही कळतंय.

First published: June 19, 2018, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading