नाशिकमधील चांदवड शस्त्रसाठा प्रकरणी 4 आरोपींवर मोक्का

नाशिकमधील चांदवड शस्त्रसाठा प्रकरणी 4 आरोपींवर मोक्का

आज नाशिक जिल्हा कोर्टाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

  • Share this:

28 डिसेंबर : नाशिकमधील चांदवडमध्ये पकडलेल्या अवैध शस्रसाठा प्रकरणी चार आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आज नाशिक जिल्हा कोर्टाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर 12 दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसानी मोठी कारवाई केली होती. एका बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. अवैधरीत्या शस्रासाची वाहतूक करताना चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या कडून पोलिसांनी 19 पिस्तुल, 24 रायफल्स आणि चार हजार 136 काडतुसे हस्तगत केली होती. हा सर्व शस्रसाठा उत्तर प्रदेशातील असल्याच पोलीस तपासात समोर आलंय.

या कारवाईत नाशिक पोलिसांनी मुंबईच्या शिवडीतील अकबर बादशहा,नागेश बनसोडे,अमीर शेख,वाजीद आली यांना अटक केली होती. आज या सर्व आरोपीना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात. ह्या सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईचे आदेश दिले असून या आरोपीना पुढील सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आहे.

First Published: Dec 28, 2017 10:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading