भाजपला पुन्हा धक्का, मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला

भाजपला पुन्हा धक्का, मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला

महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेनं जागा राखली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत.

मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांना 4427 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार दिनेश पांचाळ यांना 3042 मते मिळाली. त्यामुळे विठ्ठल लोकरे यांचा 1385 मतांनी विजय झाला आहे. मुंबई महापालिकेच्या मानखुर्द वार्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 9 जानेवारी रोजी मतदान झालं. तर आज (10 जानेवारी)या निवडणुकीचा निकाल लागला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. 25 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. त्यामध्येही शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन आणि समाजवादीचे खान जमिर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, शिवसेनेनं मारली बाजी

नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून मनसेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं.

Tags:
First Published: Jan 10, 2020 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading