सातारा, 26 मे: नाशिकमध्ये (Nashik) मागील महिन्यात ऑक्सिजन टँक लिक झाल्यामुळे 25 रुग्णांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेमुळे अवघ्या देशात खळबळ उडाली होती. आता साताऱ्यात (Satara) सुद्धा नाशिक सारखी घटना थोडक्यात टळली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन (oxygen) यंत्रणेत बिघड झाल्याची घटना समोर आली आहे. पण वेळीच रुग्णांना दुसरीकडे हलवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
साताऱ्यातील औंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Health Center Aundh) बुधवारी रात्री ही घटना घडली. औंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. अनेक रुग्ण हे व्हेंटिलेटर आहे. पण, मंगळवारी रात्री अचानक ऑक्सिजन यंत्रणेतच बिघाड झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठाच खंडीत झाला होता.
VIDEO: विराट कोहलीची फुटबॉल किक Social Media वर हिट!
त्यामुळे आरोग्य केंद्रात एकच कल्लोळ उडाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयात हलवले. वेळीच 15 रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू झाल्याने मोठा अनर्थ टळला. रुग्णांना वेळेवर हलवण्यात आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुंबईतील औषध कंपनीच्या शास्त्रज्ञाने केली होती धडपड; आज संजीवनी ठरतेय 'हे' औषध
एप्रिल महिन्यात नाशिकमधील पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली होती. यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला होता. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर होते. तर, व्हेंटिलेटरवर आणी अत्यवस्थ 67 रुग्ण होते. टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 25 रुग्ण दगावले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.