नाशिक, 06 नोव्हेंबर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद आहेत तर ऑनलाइन पद्धतीनं शिकवणी सुरू आहेत. ऑनलाइन पद्धतीनं क्लास आणि परीक्षा दोन्ही सुरू आहेत. परीक्षेत कमी मार्क मिळाल्यानं आलेल्या नैराश्येतून विद्यार्थ्यानं धक्कादायक पाऊल उचललं आहे. इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाल्यानं चक्क त्यानं घर सोडलं आहे. ही घटना नाशिक उपगनरात घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
लॉकडाऊन काळात गेल्या 6 महिन्यांपासून शाळा बंद असल्यानं , सध्या सगळ्या शाळा ऑनलाईनच भरत आहेत. अशातच नववीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला नुकत्याच झालेल्या शाळेच्या ऑनलाईन परीक्षेत कमी गुण मिळाले. त्याच्या आईने देखील त्याला कमी गुण का मिळाले असा जाब विचारला. ऑनलाईन अभ्यास समजत नाही, आशा प्रकारची तक्रार या विद्यार्थ्याने यापूर्वी देखील आपल्या घरच्यांकडे केली होती. त्यामुळे नैराश्येतून हा मुलगा आपल्या घरातून निघून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान नाशिकच्या उपनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा-हे भलतच! या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO
या विद्यार्थ्याच्या अशा अचानक गायब होण्यानं खळबळ उडाली आहे. या बेपत्ता विद्यार्थ्याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. दरम्यान अनेक ठिकाणी आजही ऑनलाइन अभ्यासक्रम पोहोचण्यास तोकडा पडत आहे तर कुठे विद्यार्थ्यांना समजण्यासााठी कमी पडत असल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये घरातून असणारं मार्कांचं प्रेशर या सगळ्यात येणाऱ्या नैराश्य आणि भीतीपोटी या विद्यार्थ्यानं घर सोडलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.