नाशिकमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात, 'स्कॉरपिओ'ला दोन्ही बाजूने जोरदार धडक

नाशिकमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात, 'स्कॉरपिओ'ला दोन्ही बाजूने जोरदार धडक

चार वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

  • Share this:

नाशिक, 6 जानेवारी : नाशिक शहरातून धुळ्याकडे जाणाऱ्या हायवेवर विचित्र अपघात घडला आहे. चार वाहनांची धडक झाल्याने घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर जखम झाली नाही. मात्र वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

धुळ्याकडे जाणाऱ्या हायवेवरील फ्लायओव्हरवर इनोव्हा, आयशर, स्कॉर्पिओ आणि अशोक लेलंड ट्रक अशा चार वाहनांनी एकमेकांना ठोकलं. या विचित्र अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चार वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी प्रशासकीय उपाययोजनांसह चालकांनीही वाहन चालवताना नियमांची अंबलबजावणी करण्याची गरज बोलून दाखवण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 6, 2020, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading