गुलाबजामच्या पाकात पडून 3 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबजामच्या पाकात पडून 3 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

. गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा गरम पाक तयार केला जात होता. अशातच खेळता खेळता स्वराचा पाय घसरला आणि ती थेट गरम पाकाच्या कढईत पडली.

  • Share this:

नाशिक, 30 एप्रिल : गुलाबजामसाठी तयार करण्यात आलेल्या साखरेच्या गरम पाकात पडून 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशकातल्या हिरावडीमध्ये घडलीय.

नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणा-या शिरोडे परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुरड्या स्वराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शिरोडे परिवाराचा केटरिंगचा व्यवसाय आहे. घरात गुलाबजाम तयार करण्याचं काम सुरू होतं. गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा गरम पाक तयार केला जात होता. अशातच खेळता खेळता स्वराचा पाय घसरला आणि ती थेट गरम पाकाच्या कढईत पडली. तिचा आवाज एकताच तिच्या आजोबांनी आणि वडिलांनी थेट तापत्या कढईत हात घालून तिला बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत ती गंभीररित्या भाजली गेली होती. स्वराला तशाच अवस्थेत सद्गुरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यानंच स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनानं मात्र आरोपांचा इन्कार केला आहे. पेशंट आलं त्यावेळेसेच 85 टक्के भाजलेलं होतं. पेशंट वाचणार नसल्याची कल्पना नातेवाईकांना दिली होती. पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पेशंट वाचू शकला नाही.

या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी सदगुरु हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याचा आरोप हॉस्पिटल प्रशासनानं केला आहे. तसंच नातेवाईकांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देखिल दाखल केली आहे. मात्र एका चिमुरडीचा हाकनाक बळी गेल्यानं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 06:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading