नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार? 'हे' 2 नेते युतीच्या संपर्कात

विधानसभा निवडणुकीआधी नाशिक जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लवकरच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 10:01 AM IST

नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार? 'हे' 2 नेते युतीच्या संपर्कात

नाशिक, 17 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीआधी नाशिक जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लवकरच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण आघाडीचे जिल्ह्यातील विद्यमान तसंच माजी आमदारही युतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निर्मला गावित या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

दुसरीकडे, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी नाशिकमध्ये आघाडीला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिंडोरीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावार लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधलं.

धनराज महाले हे मूळ शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने दिंडोरीतून धनराज महाले यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भारती पवार यांनी धनराज महालेंचा पराभव केला.

Loading...

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. कारण आधी लोकसभेत महालेंना तिकीट दिल्याने भारती पवारांनी पक्ष सोडला. त्यानंतर आता धनराज महालेही राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत.

VIDEO : राणेंचा शिवसेना सोडण्याचा निर्णय आणि 'त्या' 2 चिठ्ठ्या, शरद पवारांची तुफान टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...