राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत !

राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत !

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत पोहोचले आहे.

  • Share this:

20 नोव्हेंबर : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत पोहोचले आहे. मुख्यमंत्री फडणवीस लवकरच अमित शहा आणि दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं कळतंय.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी स्वत: पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापनेनंतर राणेंनी भाजपसोबत घरोबा केला. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात राणेंचा सहभाग निश्चित समजला जातोय. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. त्यातच विधानपरिषद निवडणूक होतेय.

या निवडणुकीत नारायण राणे लढणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आज संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

या भेटीबाबत नारायण राणेंनी दुजोरा दिला असला तरी चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात ठेवलाय. लवकरच पत्रकार परिषद घेऊन राणे विधानपरिषद निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे असं कळतंय. काही दिवसांपूर्वीही राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

First Published: Nov 20, 2017 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading