मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्या नेत्याला लोकसभेत हरवलं, तोच आता उदयनराजेंच्या भेटीला, साताऱ्यात खळबळ

ज्या नेत्याला लोकसभेत हरवलं, तोच आता उदयनराजेंच्या भेटीला, साताऱ्यात खळबळ

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

सातारा, 10 जानेवारी : 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो', असं नेहमी म्हटलं जाते त्याचा अप्रत्यय आज साताऱ्यात (Satara) पाहण्यास मिळाला. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन नेते एकत्र आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil)यांनी आज  भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांना दणका, 4 अधिकाऱ्यांना करावं लागणार शिपायाचं काम 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील आणि खासदार उदयनराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. नरेंद्र पाटील यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला  उभे राहिले होते. तर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांची लढत चांगलीच गाजली होती. पण, उदयनराजे यांनी सहज निवडणूक जिंकली होती. मैदानातील लढाईनंतर आता दोन्ही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे. साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनावरून वाद दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का देत साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी उदघाटन उरकले होते. त्यानंतर साताऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. ग्रेड सेपरेटरवरील नाम फलक फाडल्याने तणाव निर्माण झाला होता आणि यानंतर लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात दाखल झाले. अवघड आहे! दुचाकी आहे की 7 सीटर? पोलिसाने भररस्त्यात बाबांसमोर हातच जोडले साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बांधकाम विभाग आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी कमराबंद चर्चा केली. या बैठकीत मात्र अजित पवार काय म्हणाले हे मात्र गुलदस्त्यात असलं तरी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर च्या उद्घाटनावरून वाद पेटणार असून दुसऱ्यांदा शासनाच्या वतीने उदघाट्न होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्या आहेत.
First published:

Tags: उदयनराजे भोसले, सातारा

पुढील बातम्या