उदयनराजेंकडून 'घायाळ' झालेला शिवसेनेचा वाघ 'मातोश्री'वर

उदयनराजेंकडून 'घायाळ' झालेला शिवसेनेचा वाघ 'मातोश्री'वर

नरेंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 26 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा त्यांनी पराभव केला. नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना थेट आव्हान दिलं होतं. युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील सातारामध्ये जात प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण, त्यानंतर देखील नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं त्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती. साताऱ्याच्या लोकांनी चांगली मतं दिली. पण, काही बाबतीत आम्ही कमी पडलो. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.

सातारचा इतिहास

याच मतदारसंघातून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही खासदार झाले. भाजप सोडून जवळपास सगळ्या प्रमुख पक्षांचे उमेदवार इथून खासदार झाले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सीपीआय यांचा समावेश आहे. 2009 मध्ये मध्ये उदयनराजे भोसले खासदार झाले. त्यानंतर त्यांचा दबदबा तिथे कायम होता. सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, उत्तर कराड, दक्षिण कराड, सातारा आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

मागच्या वेळी मोदी लाटेतही उदयनराजे भोसले यांनी जोरदार विजय मिळवला होता. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 22 हजार 531 मतं मिळाली होती. दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव होते. त्यांना 1 लाख 55 हजार 937 मतं मिळाली होती.

VIDEO: पश्चिम द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार!

First published: May 26, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या