मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /... म्हणून मी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला, पक्ष सोडताच नरेंद्र पाटलांना उद्धव ठाकरेंवर निशाणा

... म्हणून मी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला, पक्ष सोडताच नरेंद्र पाटलांना उद्धव ठाकरेंवर निशाणा

'मागील सरकारच्या कालावधीतील नेत्यांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे'

'मागील सरकारच्या कालावधीतील नेत्यांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे'

'मागील सरकारच्या कालावधीतील नेत्यांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे'

सोलापूर, 24 मार्च : शिवसेनेचे नेते आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेना (Shivsena) अखेर 'जय महाराष्ट्र' केला आहे. त्याचबरोबर भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंसोबतच्या (Udayan Raje Bhosle) गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याबाबत त्यांनी त्याबाबत खुलासा केला आहे.

'मागील सरकारच्या कालावधीतील नेत्यांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे. माझ्या विरोधात देखील मुख्यमंत्र्यांना भडकवण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले' असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी 'आपण शिवसेना सोडत' असल्याचे जाहीर केले होते. शिवसेना सोडल्याच्या कारणांचा खुलासा माजी आमदार नरेंद्र पाटलांनी आज सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला. मराठा आरक्षणावरूनही त्यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.

Mansukh Hiren death प्रकरणाचा तपास NIA कडे द्या, ठाणे कोर्टाच्या ATS ला आदेश

'देवेंद्र फडणवीस यांनी, मी राष्ट्रवादीत असताना देखील माझी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून खासदारकीही लढवली. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते. मात्र त्यांनी महामंडळ बरखास्त केल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिले. तसंच 'यापुढे आपण भाजप पक्षासाठी काम करणार असून आमचे नेते देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश करेन' असेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजेंच्या गळाभेटीच्या व्हायरल व्हिडिओबाबत केले स्पष्टीकरण

'उदयनराजे भोसलेंच्या गळाभेटीच्या व्हायरल व्हिडीओबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रवासात असताना योगायोगाने उदयनराजे भोसले यांची भेट झाली. राज्यातील अस्थिर वातावरण पाहता स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, असे मी मनमोकळेपणाने बोललो. पण पहाटेचा शपथविधी होणार की दुपारचा शपथविधी होणार हे मी सांगू शकत नाही. कोणतेही तर्कवितर्क लावायला मी काही ज्योतिष नाही. सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त केली' असेही स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिले.

अशोक चव्हाणांमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागला 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का लागला. 'आरक्षण देण्यामध्ये शिवसेना ही भाजपसोबत होती. मात्र महाविकास आघाडीत अशोक चव्हाण यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. मराठा समाजातील विविध संघटनांनासोबत घेणे ही अशोक चव्हाणांची जबाबदारी होती. मात्र, न्यायालयाकडून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केले नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai, Satara, Shivsena, Solapur