INDIA WALI DIWALI मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर शेअर केला राजकुमार रावचा VIDEO

INDIA WALI DIWALI मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर शेअर केला राजकुमार रावचा VIDEO

इंडियावाली दिवाळी ही संकल्पना राजकुमार रावच्या साथीने पंतप्रधान मोदींनी मांडली आहे. हा VIDEO सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छांबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मोदींच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या YouTube व्हिडिओची सगळीकडे चर्चा आहे. इंडियावाली दिवाळी INDIA WALI DIWALI साजरी करा, असं सांगताना मोदींनी राजकुमार रावचा एक VIDEO शेअर केला आहे. देशाच्या विविध संस्कृतींचं आणि तिथल्या दिवाळीचं दर्शन घडवणाऱ्या या व्हिडिओत अभिनेता राजकुमार राव आहे. आपला आनंद वाटून साजरा करा. असा संदेश असलेला हा इंडियावाली दिवालीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे. तुमच्या आनंदात इतरांना सहभागी करून घ्या असा संदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना मन की बातच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या. दिवाळीचा आनंद वाटून साजरा करा. गरजवंतांना द्या, त्यांना आनंदात सहभागी करून घ्या, असा संदेश दिला होता. दान करा, इतरांना वाटा अस असा हा संदेश त्यांनी आता व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. मिठाई, वापरलेले किंवा नवे कपडे, भेटवस्तू, कंदील, दिवे अशा स्वरूपात भेट देऊन गरजवंतांना गरिबांना, अनाथांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घ्या, असा संदेश हा व्हिडिओ देतो.

--------------

अन्य बातम्या

फटाक्यांमुळे भाजल्यावर चुकूनही करू नका या 5 चुका, घरगुती उपायांनी करा उपचार

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर धमाकेदार ऑफर्स, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मोठी सूट

दिवाळी 2019 : तुम्ही खरेदी करत असलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading