नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, आणखी काही दिग्गज होणार 'भाजप'वासी

नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, आणखी काही दिग्गज होणार 'भाजप'वासी

विधानसभा निवडणुकींसाठी 13 सप्टेंबरच्या सुमारास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून त्या आधी पंतप्रधानांचा दौरा होत असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 1 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते 7 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून दिवसभरात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादला त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदींच्या दौऱ्याकडे लागलं आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे विरोधीपक्षांवरचा दबावही आणखी वाढलाय.

पंतप्रधान मोदी सकाळी 7 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर 2 वाजता औरंगाबाद आणि सायंकाळी 5 वाजता नागपूरमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या ब्रॉड ग्रेड कोचेसच्या कारखाण्याचा भूमिपूजन समारंभ असून जाहीर सभाही होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असून आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 13 सप्टेंबरच्या सुमारास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून त्या आधी पंतप्रधानांचा दौरा होत असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय.

'समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी 'राष्ट्रवादी'ची स्थिती'

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर  ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत अशी टीका त्यांनी केलीय. भाजपाच्या गंगेत डुबकी मारून पवित्र होऊ असा या नेत्यांचा समज आहे. मात्र ती गंगाच मलिन झालेली आहे. अशी टीकाही आडम यांनी केलीय. समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे असा टोलाही त्यांनी बीड इथं बोलताना लगावला.

सुरेश जैन यांनी मंत्री झाल्यावर केला होता 'घरकुल घोटाळा' दडपण्याचा प्रयत्न

कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते कॉ.अशोक ढवळे, सीपीएमचे कॉ.उत्तम माने कॉ.पी.एस घाडगे, शेकापचे भाई मोहन गुंड, इत्यादी नेते उपस्थित होते. आडम पुढे म्हणाले, देशात आर्थिक बेरोजगारी आणि बेकारी वाढत आहे, कामगारांवर उपासमारीची वेळ येतेय, देशात 34 कोटी लोकांना फक्त एकाच वेळचं जेवणं मिळतं. पारले बिस्कीट कंपनी मधील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, शस्त्राअस्त्र बनवणाऱ्या कंपनी मधील कामगार कमी केली जात आहेत.

VIDEO: 'आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही'

सरकारशी भांडून रक्त सांडून कामगारांसाठी कायदे केले गेले मात्र आज त्याच कायद्याची पायमल्ली होत आहे. खचून न जाता देशाच्या एकूण परिस्थितीला बदलण्यासाठी व्यवस्थे विरोधात बंड पुकारण्यासाठी, दोन हात करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असं आवाहनही त्यांनी केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 1, 2019, 7:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading