नरेंद्र मोदींच्या शपधविधी सोहळ्यात पंढरीतल्या वारकऱ्यांचीही हजेरी

नरेंद्र मोदींच्या शपधविधी सोहळ्यात पंढरीतल्या वारकऱ्यांचीही हजेरी

विविध क्षेत्रातल्या तब्बल 8 हजार मान्यवरांना या शपथविधी समारंभात बोलावण्यात आलं होतं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा झाला.

  • Share this:

विरेंद्र उत्पात पंढरपूर 30 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला विविध धर्म संप्रदायातल्या मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं. भागवत धर्माची पताका देशभर फडकविणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या 11 मान्यवरांना खास या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं.

ऐन एकादशीच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी असल्याने या निमंत्रणाला खास महत्त्व आहे. एकदाशीला वारकरी संप्रदायात खास महत्त्व आहे. तर नरेंद्र मोदीही या आधी पंढरपूरला येऊन गेले आहेत. त्यामुळे पंढपूरातून वारकऱ्यांच प्रतिनिधीत्व सोहळ्यात असल्याने वारकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  देवव्रत (राणा) महाराज वासकर, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, निवृत्ती महाराज नामदास, चैतन्य महाराज देहूकर, विठ्ठल महाराज चवरे, हरी महाराज लबडे, महेश महाराज भिवरे, गणेश महाराज कराडकर, भागवत महाराज हंडे, शाम महाराज उखळीकर, विरेंद्र महाराज उत्पात यांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं.

आठ हजार खास पाहुणे

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान यांसारख्या देशांचा समावेश आहे. याशिवाय देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. एकूण 60 मंत्र्यांनी या सोहळ्यात शपथ घेतली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मंत्रिमंडळात सहभागी झाले. तर माजी परराष्ट्रसचिव एस. जयशंकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

स्वामी विश्वेश्वर तीर्थ, साध्वी ऋतुंभरा, इशा फाऊंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह अध्यात्मिक क्षेत्रातले अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

First published: May 30, 2019, 7:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading