मोदींकडून शिवसेनेला 15 दिवसांत दुसरा मोठा धक्का? दिल्लीत हालचालींना वेग

मोदींकडून शिवसेनेला 15 दिवसांत दुसरा मोठा धक्का? दिल्लीत हालचालींना वेग

दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून : दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरला दिलं जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारनं नुकतीच याबाबत जगनमोहन रेड्डी यांना ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरुपती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आग्रही असल्याचं दिसत होतं.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात ऐतिहासिक यश मिळालं आहे. भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळातही फारसं काही हाती लागलं नाही. त्यानंतर आता शिवसेनेला उपाध्यक्षपदापासूनही दूर राहावं लागण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेनेला काय मिळणार?

राज्यातला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. या विस्तारात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रतिनिधीत्व मिळेल असंही ते म्हणाले. लवकरच सगळ्यांना गोड बातमी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात होतं. असं गाजर दाखवून असंतुष्टांना शांत ठेवण्याची ही राजकीय खेळी होती असंही बोललंय जात आहे.

SPECIAL REPORT: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं नेमकं काय ठरलंय?

First published: June 12, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading