OBC आरक्षणावर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

OBC आरक्षणावर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

OBC Reservation : OBC आरक्षणामध्ये सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. OBC आरक्षणाबाबत देखील मोदी सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. सध्या 27 टक्के आरक्षण हे ओबीसींना दिलं जात आहे. पण, या 27 टक्के आरक्षणाला विभागण्याचा निर्णय मोदी सरकार घेऊ शकते. ओबीसी जातींची 3 विभागांमध्ये विभागणी होऊ शकते असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. सरकारच्या एका पॅनलनं याबाबत शिफारस केल्याचं बोललं जात आहे. यावर सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय विचारविनियम करून निर्णय घेईल. जर, OBC आरक्षणावरच्या प्रस्तावाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं परवानगी दिल्यास OBC आरक्षणामध्ये काही बदल दिसू शकतात.

लोकसभेतील पराभवामुळे प्रियांका गांधी नाराज; कार्यकर्त्यांवर फोडलं खापर

27 टक्के आरक्षणामध्ये किती जाती?

ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिलं जातं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये 27 टक्के आरक्षण हे ओबीसींना दिलं जातं. यामध्ये 2633 जाती आहेत. सरकारी पॅनलनं 27 टक्के आरक्षणाला तीन विभागांमध्ये विभागण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे 27 टक्के आरक्षण हे 2633 जातींमध्ये विभागलं जाईल. सध्या सर्व जाती या एकाच वर्गात मोडतात. त्यापैकी काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.

आयोगाच्या म्हणण्यानुसार 2633 जातींपैकी काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्या जातींना 10 टक्के कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवाय, काही प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींना देखील 10 टक्के आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसंच, ज्या जातींना सर्वाधिक जास्त आरक्षणाचा लाभ मिळतो त्या जातींना 7 टक्के आरक्षणामध्ये ठेवलं जाण्याची शिफारस आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? आजच्या बैठकीकडे लक्ष

राज्यात देखील आरक्षणाचा मुद्दा

राज्यात देखील सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर देखील सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवाय, ब्राह्मण, मुस्लीम आरक्षणाची मागणी केली जात आहे.

महिला रस्त्यावर पाडून चाबकाने बेदम मारहाण, VIDEO समोर

First published: June 13, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading