नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या संजीव पुनाळेकरसह एकाला मुंबईतून अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या संजीव पुनाळेकरसह एकाला मुंबईतून अटक

नरेंद्र दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने मुंबईतून दोघांना अटक केली आहे. संजीव पुनाळेकर ,विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

मुंबई, 25 मे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे  या दोघांना मुंबईतून अटक केली आहे. सीबीआयचे अधिकारी दोघांना पुण्यात घेऊन गेले आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता पुणे कोर्टात या दोघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

सनातन संस्थेचे सल्लागार असलेले संजीव पुनाळकर गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर आज सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत पुनाळकर यांचे नाव पुढे आल्याची सुत्रांची माहिती आहे. पुनाळकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती.  डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे  असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोळकरांची ओळख करुन देणे,  हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावली. ही पिस्तुलं त्यांनी तोडून खाडीमध्ये फेकून दिली, असा दावा सीबीआयने केला आहे. हत्येच्या वेळी एकूण चार जण उपस्थित होते, असा दावाही सीबीआयने केला आहे. डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम.एस.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी ही चार पिस्तुलं वापरण्यात आली होती का, हे आता तपासातून पुढे येणार आहे.

वैभव राऊत आणि शरद कळसकर 23 जुलै 2018 च्या रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तुकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे जिथे फेकले ती जागा ठाण्यातील कळव्याचा पूल, वसईमधला खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल यापैकी एक जागा होती.

निर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागचा चेहरा तब्बल पाच वर्षांनी समोर आला. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपी शरद कळसकरनं दिलेल्या जबाबावरून सीबीआयनं सचिन अंदुरेला औरंगाबादमधून अटक केली. याच सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. सचिन अंदुरेच्या अटकेसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला तो म्हणजे एटीएसने नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक केलेल्या वैभव राऊतचा जबाब. गेल्या पाच वर्षात देशाने विचारवंतांना गमावले. दाभोळकरांच्या हत्येपासून ते आरोपींना पकडण्यापर्यंतचा घटनाक्रमावर एक नजर टाकू...

२० ऑगस्ट २०१३- पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या

२० जून २०१४- पुणे

मनीष नागोरी आणि विलास खंडेलवाल यांना अटक

डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना गावठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप

पुणे शहर पोलिसांनी केली अटक

२० फेब्रुवारी २०१५- कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या

३० ऑगस्ट २०१५- कर्नाटक, धारवाड

एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या

एसआयटीचा तपास

१६ सप्टेंबर २०१५- सांगली

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक

एसआयटीने केली अटक

११ जून २०१६- पनवेल

वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून अटक

दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून अटक

सध्या जामिनावर बाहेर

५ सप्टेंबर २०१७- कर्नाटक, बंगळुरू

गौरी लंकेश यांची हत्या

१७ जून २०१७ - कोल्हापूर

समीर गायकवाडला जामीन मंजूर

२१ मे २०१८- पुणे

अमोल काळेला अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक

अमोल काळेकडील डायरीतून महाराष्ट्रातले धागेदोरे उघड

अमोल काळेच्या डायरीत ३४ जण हिट लिस्टवर

१२ जून २०१८ - विजयपुरा, कर्नाटक

परशुराम वाघमारेला अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक

१० ऑगस्ट २०१८- नालासोपारा

वैभव राऊत एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

स्फोटकं बनवल्याचा आरोप

१० ऑगस्ट २०१८, नालासोपारा

शरद कळसकर

एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

रेकी आणि दाभोलकरांवर गोळीबाराचा आरोप

१० ऑगस्ट २०१८- नालासोपारा

सुधन्वा गोंधळेकर

एटीएसकडून अटक

कटात सहभागी असल्याचा आरोप

१८ ऑगस्ट २०१८- औरंगाबाद

सचिन अंदुरे, सीबीआयकडून अटक

सध्या सीबीआय कोठीत

डॉ. दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा आरोप

१९ ऑगस्ट २०१८- जालना

श्रीकांत पांगारकरला अटक

एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

पैसे पुरवल्याचा आरोप

२१ ऑगस्ट २०१८, औरंगाबाद

शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेघे यांना अटक

सचिन अंदुरेच्या जबाबानुसार अटक

शस्त्र लपवणे आणि बेकायदा बाळगल्याचा गुन्हा

पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 25, 2019, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading