डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी संजीव पुनाळेकरांना सशर्त जामीन

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी संजीव पुनाळेकरांना सशर्त जामीन

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये संजीव पुनाळेकरांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, वैभव सोनवणे, 05 जुलै : अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाचे विशेष न्यायधीश आर. एम. पांडे यांनी काही अटींवर संजीव पुनाळेकर यांना हा जामीन मंजूर केला आहे. वकील संजीव पुनाळेकर हे सनातनचे वकील आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्र लपविण्याच्या सूचना पुनाळेकरांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. संजीव पुनाळेकर यांना अटक केल्यानंतर त्यांनी रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

नितेश राणेंच्या अटकेचा निषेध; कणकवलीत व्यापाऱ्यांचा बंद

संजीव पुनाळेकरांचा काय संबंध?

डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत पुनाळकर यांचे नाव पुढे आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुनाळेकरांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे असे आरोप संजीव पुनाळेकरांवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोळकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली होती. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

VIDEO: भारतात 'या' ठिकाणी दिसला जगातील सर्वात दुर्मीळ प्राणी

First published: July 5, 2019, 4:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading