मोठा खुलासा: 'कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या' Narendra Dabholkar Murder Case | CBI | Sharad Kalaskar

मोठा खुलासा: 'कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या' Narendra Dabholkar Murder Case | CBI | Sharad Kalaskar

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे.

  • Share this:

पुणे, 26 जून:  डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शरद कळसकर (Sharad Kalaskar)आणि सचिन अंदुरेने (Sachin Andure) या दोघांनीच नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले. पुण्यातील विशेष कोर्टात सीबीआयने एक अहवाल सादर केला. या अहवालात कळसकर आणि अंदुरे या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानलं जातं.

दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली कळसकरने दिल्याचे सीबीआयने या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी कळसकरवर फोरेन्सिक सायकॉलॉजिकल अ‍ॅनेलेलिस टेस्ट झाली होती. या टेस्टमध्ये त्याने दाभोलकरांवर गोळ्या झाल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. जून 2018मध्ये कळसकरने संजीव पुनाळकरची भेट घेतली होती. काळसकरने पुनाळकरला हत्येची सामग्री नष्ट करण्यास सांगितल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले.

काय म्हटले आहे सीबीआयच्या अहवालात

1- त्यांच्याकडे गोळ्या कशा आल्यात

2. ते पुण्यात कसे आले

3. दाभोळकरांची हत्या करण्याचं कारण काय

4. त्यांच्याकडे शस्त्र कुठून आली

5. कट कसा रचला

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

विधानसभेत अजित पवारांना पराभूत करण्याचं टार्गेट- चंद्रकात पाटील

First published: June 26, 2019, 10:26 AM IST

ताज्या बातम्या