मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

6 वर्षांत 4 ज्येष्ठ विचारवंतांची हत्या, असे आहे औरंगाबाद कनेक्शन!

6 वर्षांत 4 ज्येष्ठ विचारवंतांची हत्या, असे आहे औरंगाबाद कनेक्शन!

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आता महाराष्ट्रातल्या औरंगाबादच कनेक्शन उघड झाले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आता महाराष्ट्रातल्या औरंगाबादच कनेक्शन उघड झाले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आता महाराष्ट्रातल्या औरंगाबादच कनेक्शन उघड झाले आहे.

कोल्हापूर,10 जानेवारी: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या 6 वर्षांत 4 ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्या झाल्या त्यातून समाजातील 'दहशतवाद' समोर आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आता महाराष्ट्रातल्या औरंगाबादच कनेक्शन उघड झाले आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची, 16 फेब्रुवारी 2015 रोची कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची, 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची तर 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूत पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणांनी दक्षिण भारतात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे डॉ. दाभोलकरांवर भ्याड पणे गोळ्या झाडण्यात आल्या. समाजातील एक ज्येष्ठ विचारवंत अशी ओळख असलेल्या कॉम्रेड पानसरे यांच्यावरही अशाच पद्धतीने गोळ्या घालण्यात आल्या तर उजव्या विचारसरणीच्या विरोधात काम करणाऱ्या डॉ.एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरही अशाच पद्धतीने गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या चारही हत्यांचं कनेक्शन एक असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता, त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक मधल्या तपास यंत्रणांनी तपास सुरू केला. पण ज्याप्रमाणे डॉ.कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास लागला आहे. त्याप्रमाणे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात मात्र महाराष्ट्र पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाइंड ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंड मधल्या धनबाद येथून अटक करण्यात आली आहे. कर्नाटक एसआयटीने ही कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो धनबाद मधल्या कतराजमध्ये वास्तव्य करत होता. पण तो मूळचा महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादचा आहे. 1962 मध्ये जन्मलेल्या गौरी या लंकेश पत्रिकेच्या संपादक होत्या. नक्षल समर्थक आणि हिंदू विरोधी अशी प्रतिमा त्यांची तयार करण्यात आली होती. काही काळ त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांमध्येही नोकरी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या आणि धडाडीच्या पत्रकार अशी गौरी लंकेश यांची ओळख होती, आता त्यांच्या हत्येचा मास्टर माईंड ऋषिकेश जेरबंद झाला असला तरी विचारवंतांना संपवणारी ही मानसिकता कधी संपणार हा खरा प्रश्न आहे. विचारवंतांच्या हत्या करून विचार संपत नाहीत त्यामुळे या चारही विचारवंतांवर जरी गोळ्या झाडल्या असल्या तरी त्यांचे विचार समाज जोपासत राहील यात मात्र शंका नाही. असे आहे औरंगाबाद कनेक्शन! गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषिकेश देवडीकर हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादचा आहे. औरंगाबादेत ऋषिकेश याचे पतंजलीचे दुकान होते. शहरातील एन-9 सिडको भागात तो दुकान चालवायचा. आई, वडील, पत्नी आणि मुलीसह तो वास्तव्य करत होता. ऋषिकेश याने जगदीश कुलकर्णी यांचे दुकान भाड्याने घेतली होते. मात्र, 2016 मध्ये ऋषिकेश याने साहित्यासह दुकान सोडले होते अशी माहिती दुकान मालक जगदीश कुलकर्णी यांनी दिली आहे. शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघेही औरंगाबादचेच... डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात तब्बल पाच वर्षानंतर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तपास यंत्रणेला मोठ यश मिळालं होतं. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) पुण्यातून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. सचिन अंधुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडल्या, असा दावा सीबीआयने केला होता. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले. शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे तो कोल्हापूर नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: DR MM Kalburgi, Dr narendra dabholkar murder case, Gauri lankesh murder, Govind pansare murder case, Latest news

पुढील बातम्या