विमानतळाचं उद्घाटन झालं, मात्र विमान केव्हा उडणार? - राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

विमानतळाचं उद्घाटन झालं, मात्र विमान केव्हा उडणार? - राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा समावेश केंद्राच्या उडान योजनेंत करण्यात आल्यामुळे लवकरच या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, रत्नागिरी 5 मार्च  : विमानतळाच्या टर्मिनलच उद्घाटन केलत हे ठीक आहे पण मुख्यमंत्री आणि प्रभूनी सांगाव की नेमक विमान कधी उडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारलाय ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी. निमित्त होतं कोकणातल्या एकमेव चिपी या विमानतळाच्या उद्घाटनाचं. तुम्ही प्रकल्पाची उद्घाटनं करता पण 2014 पासून सिंधुदुर्गात सर्व प्रकल्प ठप्प आहेत  असंही राणेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन आज नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्यासह स्थानिक आमदार, नेत्यांची उपस्थिती होती. विमानतळाचं उद्घाटन झालं असलं तरी विमान सेवा देणारी कंपनी अजुन तयार झालेली नाही.

हवाईमार्गे जोडण्यासाठी 'उडान' अंतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपनीची घोषणा 25 फेब्रुवारीला होणे अपेक्षित होते. मात्र 25 तारखेची ही निविदाही अद्याप निघालेली नाही.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा समावेश केंद्राच्या उडान योजनेंत करण्यात आल्यामुळे लवकरच या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे . गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला या विमानतळावर पहिल्यांदा खाजगी विमान उतरवून या विमानतळाच औपचारीक उद्घाटन करण्याच श्रेय शिवसेनेने घेतल होतं. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाच लोकार्पण होत असल्यामुळे भाजपाचे झेंडे विमानतळ परिसरात लागले होते.

तर हे विमानतळ होणं हे राणेंचं स्वप्न होतं. राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि त्याला मी पाठिंबा दिला असंही सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना टोला लगावला.

First published: March 5, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading