मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नारायण राणेंची नवी भविष्यवाणी, ठाकरे सरकार 'या' तारखेला कोसळणार!

नारायण राणेंची नवी भविष्यवाणी, ठाकरे सरकार 'या' तारखेला कोसळणार!

'पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहे. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहे'

'पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहे. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहे'

'पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहे. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहे'

सिंधुदुर्ग, 28 डिसेंबर : एकीकडे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना नोटीस बजावल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधून काढला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे सरकार दिसणार नाही, असा दावाच राणेंनी केला आहे.

सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार कोसण्याबद्दल भाकीत वर्तवलं आहे.

'पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहे. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहे. मार्चनंतर ठाकरे सरकार हे दिसणार नाही', असं भाकीतच राणे यांनी वर्तवलं आहे.

विशेष म्हणजे, याआधी अनेक वेळा नारायण राणे यांनी ठाकरे सरकार कोसळण्याबद्दल भाकीत वर्तवले होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. तेव्हा हे सरकार 11 दिवसात कोसळणार अशी भविष्यवाणी राणे यांनी केली होती. पण त्यांचा हा मुहूर्त साफ खोटा ठरला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात सरकार कोसळणार असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा राणे यांनी मार्चची डेडलाईन दिली आहे

"आम्ही तयार आता निर्णय मोदी सरकारच्या हातात", कोरोना लशीसाठी पुण्यातील सीरम सज्ज

दरम्यान, ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

'भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ते वाटेल ते आरोप करत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे' असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला.

First published:
top videos

    Tags: Narayan rane