मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नारायण राणेंचं मंत्रिपद 2 महिन्यात जाणार, कोकणातल्या आमदाराचं भाकित

नारायण राणेंचं मंत्रिपद 2 महिन्यात जाणार, कोकणातल्या आमदाराचं भाकित

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कणकवली, 12 मार्च : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असा गौप्यस्फोट कोकणातील आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. ठाकरे गटाचे असलेले आमदार वैभवव नाईक यांनी नारायण राणेंचे मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचा दावा करताना त्यामागचं कारणही सांगितलं आहे. यावेळी वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.

आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले. भाजपला राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असे भाकीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणेंवर निशाणा साधताना वैभव नाईक यांनी म्हटलं की, नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं काय झालं. वडिलांनी नेमका कोणता समझोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा अशा शब्दात टोला लगावला.

First published:
top videos

    Tags: Narayan rane