राणेंच्या भाजप प्रवेशाचा फायनल मुहूर्त ठरला! दोन्ही मुलांसह 'या' तारखेला हाती घेणार कमळ

राणेंच्या भाजप प्रवेशाचा फायनल मुहूर्त ठरला! दोन्ही मुलांसह 'या' तारखेला हाती घेणार कमळ

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 29 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसंच यावेळी नारायणे राणे यांच्या भाजप प्रवेश मुहूर्त ठरला असून 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. आता अखेर 2 ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता राणे भाजपमध्ये होणार आहेत. राणे यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे हेदेखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत, अशी माहिती आहे.

नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

भाजप प्रवेशानंतर कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्यास कोकणात आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading