Home /News /maharashtra /

जनआशीर्वाद यात्रेवरुन वातावरण तापणार, नारायण राणेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले

जनआशीर्वाद यात्रेवरुन वातावरण तापणार, नारायण राणेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले

Welcome banners of Narayan Rane teardown: नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले आहेत.

    भारत केसरकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 26 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या (Narayan Rane Jan Ashirwad Yatra) पार्श्वभूमीवर राणेंच्या स्वागताचे बॅनर जिल्ह्यात संपूर्ण हायवेवर लावण्यात आले आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण (Kharepatan) मध्येही नॅशनल हायवेच्या दुभाजकावर मंत्री राणेंच्या स्वागताचे बॅनर भाजपा कार्यकर्त्यांनी लावले आहेत. हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले (Anonymous people teardown welcome banners of Narayan Rane) आहेत. त्यामुळे भारतीय जनतेची जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील संघर्ष अटळ दिसून येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली आणि जामीनावर सुटकाही झाली. या घटनेनंतर राणे विरुद्ध शिवसेना असा सरळ संघर्ष संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला. राणेंविरोधात आक्रमक होत राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी राणेंचे बॅनर फाडले. याचे पडसाद कणकवलीत ही उमटले. "राणेंनी स्वत:ला महान समजणे बंद केले तर..." शिवसेनेचा पुन्हा हल्लाबोल कणकवलीत शिवसैनिकांकडून राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस आणि शिवसैनिकांत झटापट झाली. खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकून हल्ल्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर आता खारेपाटण मध्येही राणेंच्या स्वागताचे बॅनरही अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या होणाऱ्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ... तर कारवाई करु नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही नियमानुसारच होती. सिंधुदुर्गामध्ये संचारबंदी असताना त्यांनी रॅली काढली तर पुढेही नियमानुसारच कारवाई केली जाईल असा इशारा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Narayan rane, Sindhudurg

    पुढील बातम्या