नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द!

नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आज राणेंचा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, कोणताही प्रवेश होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग लागलीय. आत्तापर्यंत पक्षप्रवेशाचे तीन मोठे कार्यक्रम झालेत. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशावर मात्र 'तारीख रे तारीख' सुरू आहे. आज नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना आता पुन्हा त्यांचा प्रवेश लांबणीवर गेला आहे. भाजप प्रवेशाबाबत राणे वारंवार उल्लेख करत असले तरी भाजपकडून मात्र स्पष्टपणे काहीही सांगितलं जात नाही. त्यामुळे नेमकं कोण प्रवेश घेणार आहे हे अजुनही गुलदस्त्यात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणाही झाली त्यामुळे त्याआधी जास्तीत जास्त प्रवेश करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आज राणेंचा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, कोणताही प्रवेश होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होत.

'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,' असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं होतं.

इतर बातम्या - युतीच्या चर्चेवर भाजपचा हट्टीपणा कायम, शिवसेनेचा 'हा' फॉर्म्युला अमान्यच!

नारायण राणेंच्या पक्षातील या नेत्याने 'मातोश्री'वर जाऊन बांधले 'शिवबंधन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला असून आपला भाजप प्रवेश निश्चित असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे सिंधुदुर्गाच्या स्थानिक राजकारण वेगळे वळण घेत आहे. नारायण राणे यांचा पक्ष 'महाराष्ट्र् स्वाभिमान'चे मालवण तालुका अध्यक्ष आणि नगरसेवक मंदार केणी यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंदार केणी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

हे तीन नगरसेवकही शिवसेनेच्या गळाला..

इतर बातम्या - खळबळजनक! विहिरीत आईसह 4 चिमुकल्यांचा सापडला मृतदेह

मंदार केणी यांच्या पाठोपाठ आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. महाराष्ट्र् स्वाभिमानचे नगरसेवक यतीन खोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शैलजा गिरकर आणि दर्शना कासवकर यांनीही शिवसेनेची वाट धरली आहे.

..तर राणेंच्या विरोधात आपला उमेदवार उभा करेल!

इतर बातम्या - तोंडावर टॉवेल टाकून अल्पवयीन मुलीला पळवलं, नराधमाकडून शेतात बलात्कार

आपला भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी जाहीर केले असले तरी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाचा सुरुवातीपासून विरोध आहे. विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या मुलांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल, अशा इशारा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले होते. तर नारायण राणे भाजपमध्ये गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही, असे खोचक वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच करण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2019, 12:08 PM IST

ताज्या बातम्या