नारायण राणेंना मंत्रिपद मिळणार?

नारायण राणेंना मंत्रिपद मिळणार?

राणेंचं योग्य पुनर्वसन करू, आमच्या कोट्यातून त्यांना जागा देऊ, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच नाही, असं विधान काल सकाळीच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं

  • Share this:

 20 डिसेंबर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते   नारायण राणेंना लवकरच  मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

यासंदर्भात नारायण राणे -मुख्यमंत्री यांची रामगिरी बंगल्यावर बैठक झाली. काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. राणेंचं योग्य पुनर्वसन करू, आमच्या कोट्यातून त्यांना जागा देऊ, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच नाही, असं विधान काल सकाळीच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. पण या बैठकीत नक्की काय चर्चा झाली याबद्दल मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येते आहे.  तसंच राणेंचा  शपथविधी कधी होणार याविषयीही मौन पाळले जाते आहे.  मुख्यमंत्री यांच्या या विधानानंतर या महिन्याच्या शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ही राजकीय हवा पुन्हा तापायला सुरवात झालीय.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विषयी सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. खडसे प्रस्थापित नेते आहेत त्यामुळे त्यांच पुनर्वसन कसं होणार? जे विस्थापित झालेले असतात त्यांच पुनर्वसन होत, खडसे तर प्रस्थापित नेते आहे असं चिमटा ही मुख्यमंत्र्यांनी घेतला. या सर्व सूचक वक्तव्य पाहता राणे की खडसे या दोन्ही नेत्यांबाबाबत काय भूमीका घेतली जाते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

 

First Published: Dec 20, 2017 09:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading