'ही युती फक्त मातोश्रीच्या स्वार्थासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी', राणेंचा वार

'ही युती फक्त मातोश्रीच्या स्वार्थासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी', राणेंचा वार

शिवसेना आणि भाजप युतीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : 'मातोश्रीच्या स्वार्थासाठी आणि बचावासाठी भाजपसोबत युती झाली आहे. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही,' असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि भाजप युतीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली आहे.

'युती झाली तरी सेना-भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याचं काय झालं?' असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणेंची सेना-भाजपवर जहरी टीका

राज्याची सत्ता उपभोगली...टीका केली आणि परत युती केली

सेनेचं वागणं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विसरले नाहीत

ही युती फक्त नेत्यांच्या समाधानासाठी

कारवायांपासून वाचण्यासाठी शिवसेनेने ही युती केली

सर्वात जास्त भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत, तो बाहेर येऊ नये म्हणून युती

माझा पक्ष स्वतंत्र लढणार

मी खासदारकीचा राजीनामा देणार नाही

सत्तेत असून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकले नाहीत

महाआघाडीत जाण्याचा माझा विचार नाही

VIDEO : 'राजीनामे झिजले', युतीच्या घोषणेनंतर अजित पवारांची तुफान फटकेबाजी

First published: February 19, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading