मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणे आपला 12 मजली बंगला तोडण्याचे धाडस दाखवतील का? सेनेचा सवाल

नारायण राणे आपला 12 मजली बंगला तोडण्याचे धाडस दाखवतील का? सेनेचा सवाल

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

  • Published by:  sachin Salve

मालवण, 22 ऑगस्ट : 'अनवधानाने का होईना बांधकाम अनधिकृत असेल तर ते स्वत: तोडण्याचं धाडस आज मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांनी दाखवलंय. पण, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryana rane) यांचा मुंबईतील जुहू येथील 12 मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. मग असं धाडस आता राणे दाखवणार आहेत का? असा थेट सवाल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी उपस्थितीत केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव  मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आपला दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त केला आहे. या प्रकरणावरून भाजपने नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

Job Alert: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे इथे विविध पदांसाठी भरती

'मिलिंद नार्वेकरांना बंगला बांधताना CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बांधलेला बंगला पाडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस मिलिंद नार्वेकर यांनी दाखवून राजकारणात एक चांगला पायंडा पाडला आहे' असं वैभव नाईक म्हणाले.

तसंच, सदर बंगल्याला स्थानिक तहसील किंवा तलाठी यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. तरी किरीट सोमय्या चुकीची माहीती पसरवत आहेत. पण, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील 12 मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. जसा मिलिंद नार्वेकर यांना स्वत:हून बांधकाम पाडण्याचा पायंडा पाडलांय तसा भाजपचेही नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे दाखवणार आहेत का? असा सवालही नाईक यांनी केला.

नदीसोबत सेल्फी घेण्याचा नदीसोबत सेल्फमोह जवानाच्या जीवावर बेतला, अकोल्यातील घटना

तसंच, नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू. किरीट सोमय्या यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांची CRZ कायद्याचं उल्लंघन करणारी अनधिकृत बांधकामं तोडण्याच्या संदर्भातही बोलावं' असा टोलाही नाईक यांनी लगावला.

First published:

Tags: BJP, Narayan rane