नारायण राणेंची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी, आमदारकीचाही राजीनामा

नारायण राणेंची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी, आमदारकीचाही राजीनामा

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. विधान परिषद आमदारकीचाही त्यांनी राजीनामा दिलाय. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधीकडे तर आमदारकीचा सभापतींकडे पाठवल्याचं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं. काँग्रेस गेली 12 वर्षे काँग्रेसमध्ये होते.

  • Share this:

कणकवली, 21 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. विधान परिषद आमदारकीचाही त्यांनी राजीनामा दिलाय. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधीकडे तर आमदारकीचा सभापतींकडे पाठवल्याचं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं. काँग्रेस गेली 12 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण ते कधीच काँग्रेस संस्कृती न रमल्याने त्यांच्यावर अखेर काँग्रेस सोडण्याचीही वेळ आलीय. पक्ष सोडताना त्यानी अपेक्षेप्रमाणेच अशोक चव्हाणांना लक्ष केलं. मला अनेक पक्षांच्या ऑफर असून योग्यवेळी निर्णय घेऊ, असंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलं. या पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय नवरात्रोत्सानंतरच घेऊ असंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

काँग्रेस सोडल्यानंतर आपण उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात असून आपल्यासोबत आजही अनेक कार्यकर्ते यायला तयार असल्याचं राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय. आमदार नितेश राणेही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. सिंधुदुर्ग काँग्रेसची बरखास्त कार्यकारिणीही राणेंसोबत उपस्थित होती. अशोक चव्हाणच राज्यातली काँग्रेस बुडवायला निघाल्याचं राणे यावेळी म्हणाले. माजी खासदार निलेश राणेंनीही काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय. मला प्रत्येकवेळी डावललं गेल्यानेच मी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचं राणेंनी यावेळी सांगितलं

First published: September 21, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading