भाजप सोडणार का? नारायण राणेंनी भर सभेतच दिलं उत्तर

भाजप सोडणार का? नारायण राणेंनी भर सभेतच दिलं उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंचे सुपुत्र नितेश आणि निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 16 डिसेंबर : काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र नंतर नारायण राणे यांनी भाजपशी सलगी केली. त्याआधारेच त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळालं. तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंचे सुपुत्र  नितेश आणि निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र निवडणूक निकालानंतर समीकरणं बदलली आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे नारायण राणे यापुढेही भाजपमध्येच राहणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत आता खुद्द नारायण राणे यांनीच भाष्य केलं आहे.

'मी आता अन्य कुठल्याच पक्षात जाणार नाही. दोन पक्ष बदलले. आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलगे शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार,' असं वक्तव्य नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं आहे. नारायण राणे यांच्या या भूमिकेची आता जोरदार चर्चा होत आहे.

नारायण राणे आणि राजकीय वाटचाल

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण अलिकडच्या काही वर्षात कोकणाच्या राजकारणावरची राणेंची पकड सैल झाल्याची पाहायला मिळत आहे. कारण स्वत: नारायण राणे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तसंच त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांना 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पराभव पचवावा लागला.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या