Home /News /maharashtra /

नोकरीला ‘सामना’त काम मात्र पवारांचं; नारायण राणेंची संजय राऊतांवर जोरदार टीका

नोकरीला ‘सामना’त काम मात्र पवारांचं; नारायण राणेंची संजय राऊतांवर जोरदार टीका

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी करीत संजय राऊतांवर निशाणा साधला

    मुंबई, 16 जुलै : मराठा आरक्षण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती या सर्व विषयांबाबत भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शरद पवारांसह, संजय राऊंतांवर त्यांनी निशाणा साधला. याच सामनातून आतापर्यंत शरद पवारांविरोधात बातम्या येत असताना आता त्यांची मुलाखत घेतली जात आहे, याचा पुरावा नारायण राणे यांनी वृत्तपत्रांसह दाखविला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 1 मराठा आरक्षण - समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती, मोठे वकील नेमायला हवे होते, चर्चा करायला हवी होती ते केलेलं नाहीये, तिकडे सरकारने लक्ष द्यावं. 2 फक्त बाळासाहेब ठाकरे सोडा पण उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची ही मॅरेथॉन टीका आहे. 3 भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी ही मुलाखत घेतली होती 4 संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार असले तरी ते शरद पवारांचा माणूस आहे. राऊत दिल्लीत जास्त वेळ पवारांकडे असतात. पवारांचा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे 5 गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मुंबईत कोकणात जाण्यासाठी मनाई करायला माझा विरोध आहे

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या