मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane | 'अक्कल असलेल्यांच्या हाती जिल्हा बँक', निवडणुकीत भरघोस विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

Narayan Rane | 'अक्कल असलेल्यांच्या हाती जिल्हा बँक', निवडणुकीत भरघोस विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

Sindhudurg District Bank Election Result : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनीवर सडकून टीका केली.

Sindhudurg District Bank Election Result : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनीवर सडकून टीका केली.

Sindhudurg District Bank Election Result : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनीवर सडकून टीका केली.

  • Published by:  Chetan Patil

सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या सिंधुदुर्ग येथील निवासस्थानी दाखल झाले. राणेंच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष बघायला मिळतोय. जल्लोषासाठी राणेंच्या निवासस्थानाबाहेर डिजे लावण्यात आला आहे. तसेच राणे यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या हातात जिल्हा बँक आलेली आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच "मी सगळ्यांना पुरुन उरलोय. आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. मी मध्ये थांबलो नाहीय", असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

"एक जिल्हा बँकेची निवडणूक आणि तीन पक्ष. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्थमंत्री अजित पवार येतात. आणि तीनही पक्षाला पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. त्यामुळे हे देशातील विकसित राज्य अधोगतीकडे चाललं आहे. अशा अवस्थेत ते राहू नये, या राज्यातील साडे तेरा कोटी जनतेला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस यावेत यासाठी केंद्रात जसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आहे तसंच इथे आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. आम्हाला लगानची टीम नकोय", असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.

हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व, नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणेंनी Facebook पोस्ट करत म्हटलं 'गाडलाच'

"ही सत्ता माझी नाहीय, भाजपची सत्ता आलेली आहे. मी या जिल्ह्यातील देव-देवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आलेली आहे. माझे सर्व कार्यकर्ते, त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत, त्याला माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला. हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे त्याच्या ताब्यात देव-देवतांनी जिल्हा बँक दिलेली आहे. या विजयाचं श्रेय इथली जनता, कार्यकर्ते, नितेश राणे, जिल्हाध्यक्ष आणि निलेश राणे या सर्वांना जातं. आम्ही सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय. यानंतर आम्ही महाराष्ट्राकडे सत्तेकडे पाहणार", असं नारायण राणे म्हणाले.

"मुसंडी मारल्यानंतर मुसंडी दिसत नाही. आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार आहे. तीनही जिल्हायातील ज्या काही विधानसभा निवडणुका होतील, तसेच लोकसभेचा लोकप्रतिनिधी हा भाजपचाच असेल. नको असलेल्या लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधी ठेवणार नाही. ज्याला हात नाही ते हाती सत्ता घेतात. काल आमच्या एका महिलेने बोलल्यानंतर त्यांचं तोंड बंद झालं. ते हाड बोलले. ते मला कळालं नाही", असं राणे म्हणाले.

"त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली? त्यांनी बँकेचे किंवा भ्रष्टाचाराचे मिळवलेले पैसे असतील. त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काही गेलं ते बँकेचं गेलं. गप्प बसा. त्यांची अवकात नाही. 36 मतं मिळवू शकत नाहीत आणि विधानसभेच्या गोष्टी करता", असा घणाघात राणेंनी केला.

"गड आला पण सिंह गेला का ते आम्ही पाहू. गड न जाऊ देता सिंह सगळेच जिंकतो. आता आम्ही सत्ताही जिंकली आहे. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजनला वर्णी लावणार. त्याचा काही प्रश्न येत नाही",  अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

"राजन तेली यांनी वरिष्ठांकडे राजीनामा दिलेला असेल. त्याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ही काही शिवसेना नाही. ते कायद्याचा वापर करुन जिंकण्याचा प्रयत्न करत होते. नितेश राणेंचे जामीन अर्जावर चार-चार दिवस सुनावणी चालते", असं ते म्हणाले.

First published: