Elec-widget

SPECIAL REPORT : राणेंच्या राजकीय अस्थिरतेचे 'दशावतार' कधी संपणार?

SPECIAL REPORT : राणेंच्या राजकीय अस्थिरतेचे 'दशावतार' कधी संपणार?

सध्या नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशाच्या तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. त्यामुळं नेमकं राणे कधी भाजपवासी होत आहे की स्वाभिमानी हाच त्यांचा बाणा आणि पक्ष ठरणार का? हे येणारा काळच सांगेल.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : सध्या नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशाच्या तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. त्यामुळं नेमकं राणे कधी भाजपवासी होत आहे की स्वाभिमानी हाच त्यांचा बाणा आणि पक्ष ठरणार का? हे येणारा काळच सांगेल.

"मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार...पक्षही विलीन करणार..." स्वत:हून ही घोषणा करणाऱ्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला काही केल्या मुहूर्त सापडत नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची आता पुन्हा नवी तारीख समोर आली आहे. 2 ऑक्टोबर... पण या दिवसाचाही भाजप प्रवेश लांबणीवर पडणार असल्याचं समोर आलंय. हा क्रम आता नित्याचा झालाय. राजकीय कारकीर्द जिवंत ठेवण्यासाठी राणेंना भाजपवाचून पर्याय नाही. पण सध्या भाजप आणि सेनेचं सूत जुळल्यामुळे राणेंना पक्षात घ्यायची भाजपला जराही घाई नाही. परिणामी आगामी निवडणुकीत राणे परिवार निष्प्रभ होईल की काय?, अशी दाट शक्यता आहे.

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची हवा आहे.राज्यसभेत खासदार असलेल्या नारायण राणेंना राज्याच्या राजकारणातच रस असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलंय. त्यामुळं राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्याची संधी राणेंना भाजपमधून दिसत आहे. स्वाभिमानला जिल्हा परिषदच्या निवडणुका वगळता फारसं यश नाही. त्यामुळे राणेंचा स्वाभिमान पक्ष कौटुंबिक पक्ष राहिला.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पण त्यांचा दारूण पराभव झाला. सध्या नितेश राणे काँग्रेसमधून आमदार आहेत तर निलेश राणे लोकसभेचे पराभूत उमेदवार.. दोन्ही पुत्रांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजप प्रवेश आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात पोहोचली, तेव्हा फडणवीसांचं स्वागत राणेंनी केलं. तेव्हा राणेंनी आपला भाजप प्रवेश निश्चित असल्याचं जाहीरही करून टाकलं.

Loading...

पण भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणेंबद्दल चकार शब्दही काढला नाही. एकेकाळी मुख्यमंत्री पद भूषवलेले नारायण राणेंच्या उज्ज्वल कारकीर्दीला आज उतरती कळा लागली आहे. राज्यातील सर्वोच्च पद बहाल करणाऱ्या शिवसेनेसोबत काडीमोड केल्यानंतर काँग्रेसमध्येही त्यांचं मन रमलं नाही. महसूल, उद्योग यासारखी वजनदार खाती मिळूनही राणे कायम अस्वस्थ आणि असमाधानीच राहिले. वारंवार स्वाभिमानाचा नारा देत राहिले.

कधी काँग्रेस हायकमांड तर कधी राज्यातील विलासराव देशमुख असो अशोक चव्हाण वा पृथ्वीराज चव्हाण यांना उघडपणे आवाज देत राहिले. पण शेवटपर्यंत काँग्रेसच्या संस्कृतीत नारायणदादा रुळलेच नाहीत आणि आता विविध कारणांसाठी वादग्रस्त ठरलेल्या माजी खासदार निलेश आणि आमदार नितेश राणे या लाडक्या लेकांचं राजकीय करिअर सेटल करण्यासाठी भाजपशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. पण भाजपप्रवेशाचा मुहूर्त सापडत नसल्याने राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला.

निवडणुकीच्या तोंडावर राणे परिवारासोबत सुरू असलेला खेळ स्वाभिमानी कोकणी माणूस सहन करणार की, सातत्यानं पलटी मारणाऱ्या राणे परिवाराला राम-राम करणार हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...