मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राणे संतापले, म्हणाले, उद्धव ठाकरेंना जर सांगितलं ना तर...

राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राणे संतापले, म्हणाले, उद्धव ठाकरेंना जर सांगितलं ना तर...

 भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. आज पुन्हा राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 जानेवारी :  भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांची जेलवारी पक्की असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत देखील चांगलेच आक्रमक झाले. राजवस्त्र सोडून या मग बघू असं राऊत यांनी म्हटलं. तसेच ईडीच्या कारवाईने आम्ही पक्ष बदलणारे नाहीत, पक्षासाठी जेलमध्ये गेलो होतो असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता. आता संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले राणे? 

आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.  मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही. तर संजय राऊत यांनीच शिवसेना संपवली. आज त्यांना शिवसेना संपवल्याचा आनंद होत असेल. त्यांनी शिव्या देण्यापलिकडे कोणतंही काम केलं नाही. मला आज नाही 1990  पासून मला संरक्षण आहे. संजय राऊत तेव्हा लोकप्रभामध्ये लेख लिहीत होते असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

हेही वाचा : Video : अभिमानास्पद! फ्रान्सचा अलेक्झांडर भारतात आला अन् शिवरायांसमोर नतमस्तक झाला

उद्धव ठाकरेंची भेट घेणार   

पुढे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहेत. मात्र त्यांना फक्त टीका करता येते. त्याचं योगदान काय? राऊत हे आजच्या राजकारणातील जोकर आहेत. संजय राऊत जे बोलायचे ते मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच त्यांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला असा हल्लाबोल नारायण राणे यांनी राऊतांवर केला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Narayan rane, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray