ठाकरे सरकारबद्दल नारायण राणेंनी केला मोठा दावा

ठाकरे सरकारबद्दल नारायण राणेंनी केला मोठा दावा

भाजप कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वतः भाजपकडे आली होती. भाजप केंद्रात आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहे.

  • Share this:

ठाणे, 12 जानेवारी : भाजप कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वतः भाजपकडे आली होती. भाजप केंद्रात आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहे. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याचे गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहे, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. तसंच या सरकारला कायमची सत्ता दिली नाही. आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला.

ठाकरे सरकारने कर्जमाफीची दोन लाखांपर्यंत माफ करण्याची घोषणा केली आणि जीआर काढला. पण कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तारीख उल्लेख नाही, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्याच बरोबर कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येत नाही, असं सांगत मनसे आणि भाजप बाबत मी बोलणार नाही ते पक्षाचे प्रमुख बोलतील असंही नारायण राणे म्हणाले.

मी कोणावर नाराज नाही. मला यांच्याकडं कोणतीही अपेक्षा नाही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या सरकारला सिरीयस बेस नाही.सरकारला राज्याचे प्रशासन माहिती नाही डेव्हलपमेंट माहिती नाही. अशा माणसाच्या हातात  सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

या सरकारमध्ये कोण नाराज आहेत तुम्ही शोधा. माझी 50 वर्षं राजकारणात झाली. या सरकारला सहा महिने मंत्रिमंडळ जाहीर करायला लागले, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

आदित्य ठाकरेंना टोला

तर CAA बाबत आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केल्याबाबत त्यांना शिकवायची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेले लोकं आहेत. त्यांना कायदा काय माहीत आहे. जी मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ती जी मंत्र्यांची जबाबदारी आहे. ते आधी पार पाडावी काय कळत हे आदी बघावं नंतर भाजप वरती बोलाव फार जड शब्द आहे. तो पेलावले नाही म्हणून ते बाहेर आले, असा टोला देखील आदित्य ठाकरेंना नारायण राणेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 07:25 AM IST

ताज्या बातम्या