मुंबई, 31 डिसेंबर : आज भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नारायण राणे थोड्याचवेळापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे सुद्धा उपस्थित आहेत. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. आजच्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चे झाली हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
राजकीय चर्चेला उधाण
मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. भाजपाने आपलं सर्व लक्ष आता मुंबई महापालिकेवर केंद्रीत केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. सोबतच मनसे देखील युतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, MNS, Narayan rane, Raj Thackeray