नारायण राणेंनी घेतली खा.महाडिकांची भेट

नारायण राणेंनी घेतली  खा.महाडिकांची भेट

आज सकाळी साडेदहा वाजता राणेंचे कोल्हापूरमध्ये आगमन होणार असून त्यानंतर दुपारपर्यंत शासकीय विश्रामगृहावर नारायण राणे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.

  • Share this:

 कोल्हापूर,08 डिसेंबर: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजयराव महाडिक यांची भेट घेतली आहे.काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर ही भेट घेतली असल्यामुळे या भेटीबद्दल सर्वत्र चर्चा होते आहे.

नारायण राणे  आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकात नारायण राणे यांची जाहीर सभा होणार आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे कोल्हापूरच्या दौऱ्यावर  आले  आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता राणेंचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले. त्यानंतर त्यांनी महाडिकांची भेट घेतली. या बैठकीबद्दल कितीही राजकीय चर्चा चालू असल्या तरी  ही भेट राजकीय  नाही तर कौटुंबिक  भेट आहे अशी माहिती खासदार धनंजयराव महाडिकांनी दिली आहे.  दुपारपर्यंत शासकीय विश्रामगृहावर नारायण राणे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.

नंतर दुपारी चार वाजता त्यांची पत्रकार परिषद असून संध्याकाळी सहा वाजता दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते नेते आणि कार्यकर्ते नारायण राणे यांच्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आहे.

कोल्हापूरच्या या दौऱ्यानंतर नारायण राणे सांगली आणि कराडमध्येही कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत.

First published: December 8, 2017, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading