मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Chipi Airport Inauguration दरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली 'ही' विनंती

Chipi Airport Inauguration दरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली 'ही' विनंती

Chipi Airport Inauguration दरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली 'ही' विनंती

Chipi Airport Inauguration दरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली 'ही' विनंती

Narayan Rane speech during Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे.

पुढे वाचा ...
    सिंधुदुर्ग, 9 ऑक्टोबर : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) लोकार्पण मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा उपस्थित होते. या लोकार्पणाच्या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा सुद्धा साधला आहे. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक विनंती देखील केली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत नारायण राणे. (Union Minister Narayan Rane request to CM Uddhav Thackeray) नारायण राणेंमुळे कोकणात इन्स्फ्रास्ट्रक्चर मी स्वत: छोटा-मोठा उद्योजक पण नाही. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या मार्गातून करता येईल. मग मला कुणीतरी सल्ला दिला की तुम्ही टाटा इन्स्टिट्यूटकडे जा. त्यांनी मला 481 पानांचा रिपोर्ट दिला तुम्ही गोव्याच्या सारखं टूरिझम स्पॉट करा. 1995 साली सत्ता शिवसेना-भाजपची आहे. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशींना मी सांगितलं, हा जिल्हा पर्यटनासाठी देशपातळीवर आपण जाहीर कऱण्यासाठी केंद्राची परवानगी घेऊ, अर्ज केला परवानगी आली. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर सर्व सुविधा करण्यात आल्या. नंतर साहेबांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यावेळी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंना सांगून एक-एक कामासाठी रस्ते, पूल बांधणीसाठी पैसे दिले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी दिले. 80-90 लाख जिल्ह्याला यायचे. ते 100 कोटींत येऊ लागले. आज जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बनलं आहे त्याला कारण नारायण राणे आहे. दुसऱ्याचं नाव तिथं जवळपास येऊच शकत नाही. मुख्यमंत्र्यांना राणेंची विनंती इथल्या शाळा, वर्ग, शिक्षक... एकावेळी मी 340 शिक्षक आणले आणि आता शिक्षकांचा तुटवडा नाहीये. आज राज्यात दहावी-बारावी निकालात पहिले सात-आठ तरी सिंधुदुर्गातील असतात. त्याला कोण कारणीभूत आहे जनतेला माहिती आहे... ते श्रेय मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेचं होतं, साहेबांचं होतंं माझं नाहीये, मी निमित्त होतो. जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोअर करायचा... क्रेडिट कोणाला द्यायचा... माझं नाही बॅटचं आहे. मी क्रेडिट मला घेतच नाही आजही नाही. माननीय उद्धवजी एक विनंती आहे. माझ्याकडे काही कागदपत्रे आहेत फोटोज आहेत. मी आणि प्रभू याच जागेवरुन 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमीपूजन करण्यासाठी आलो. त्याचवेळी समोरच्या बाजूने आंदोलन होत होते. विमानतळ होऊ देणार नाही. जमीन घेऊ देणार नाही, आम्हाल विमानतळ नको. नुसतं विमानतळापूरतं नाही तर रेडी बंदर सुद्धा. किती विरोध-किती विरोध? कोण करतंय विचारा? मी नावे घेतली तर राजकारण होईल. महिन्यााला कोण जाऊन उभं राहतं आणि कामं आडवतं? कोण आडवत होतं विचारा जरा असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. अहो भांड काय फोडायचं किती फोडायचं? तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होतं आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय. मला काही म्हणाचं नाहीये. तुम्ही आलात मला बरं वाटलं आणंद वाटला. सन्माननीय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी इथला अभ्यास करावा. टाटांचा तो 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा आणि अनेक गोष्टी आहेत. तुम्ही वाचा आणि द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला एक रुपया नाही, कामच पुढे जात नाही. काय विकास? इथेही एअरपोर्टला पाणी नाहीये. कसला विकास? एअरपोर्ट झाला, विमानतळावरुन उतरल्यावर काय बघावं... हे खड्डे पहावे? विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी तुम्ही रस्ते आणि बाकीच्या गोष्टी करायला पहायला हव्यात असंही नारायण राणेंनी म्हटलं. विनायक राऊतांना टोला नारायण राणेंनी म्हटलं, मला आज कळालं विमानतळाचा मालक कोण? विरेंद्र म्हैसकर गेले आणि दुसरे आले कळलंच नाही ओ.... स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात म्हटलं हा कार्यक्रम कुणाचा आहे. एमआयडीसीचा आहे म्हैसकर साहेबांचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. नियमाने करा... मान सन्मान जनता देईल. कोणाला तरी अपॉईंट करुन माहिती घ्या माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं. खोट बोलणाऱ्याला बाळासाहेबांच्या जवळ थारा नव्हता. कोणाला जवळ करावं हा तुमचा प्रश्न आहे. सर्व तुम्हाला ब्रीफ होतंय, माहिती मिळतेय खरी नाहीये एवढंच म्हणेल. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याबाबत कोणाला तरी अपॉईंट करुन ही माहिती घ्या असंही राणेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री राणेंच्या कानाजवळ काय म्हणाले? नारायण राणेंनी पुढे म्हटलं, "मी इथे आल्यावर तीन-तीन विमाने पाहिले मला फार आनंद झाला आणि तसेच मी मंचाजवळ निघालो. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेब भेटले... काही तरी माझ्या कानाजवळ बोलले मी एक शब्द ऐकला. असो..." बांधवांनो विमानतळ होणं आवश्यक आहे. देशातील पर्यटक सिंधुदर्गात यावेत. पर्यटनाच्या माध्यमातून 4-5 दिवस रहावेत, सिंधुदुर्गातील व्यावसायिकांना याचा फायदा व्हावा आणि आर्थिक समृद्धी या जिल्ह्यातील लोकांना यावी या स्तुत्य हेतूने विमानतळ व्हावं असं मला वाटत होतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. माझा स्वार्थ काही नव्हता - नारायण राणे 1990 साली बाळासाहेब ठाकरेंनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. मी आलो निवडणूक लढवली आणि निवडून आलो. कणकवलीतील मोजकीच गावी मला माहिती होती. मी सिंधुदुर्गातील सर्व माहिती घेतली. पिण्यासाठी नागरिकांना पाणी नव्हतं. या जिल्ह्यात रस्ते नव्हते. वीज नव्हती. शैक्षणिक अवस्थाही चांगली नव्हती. इथले नागरिक नोकरीसाठी बाहेरच्या शहरात जात होते. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा... येथे मी आल्यावर ठरवलं या जिल्ह्याचा विकास करायचा. मी फक्त सांगतोय, लोकांनी ठरवायचं की विकास कुणी केला. उद्धवजी हे सर्व बाळासाहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं आणि त्याची अंमलबजावणी करत होते. यात माझा स्वार्थ काही नाही असंही राणेंनी म्हटलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Narayan rane, Sindhudurg, Uddhav thackeray

    पुढील बातम्या