नारायण राणे फुल्ल अ‍ॅक्शनमध्ये,' त्या' ऑफरची परतफेड करणार?

नारायण राणे फुल्ल अ‍ॅक्शनमध्ये,' त्या' ऑफरची परतफेड करणार?

शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हे दोघं सोडले तर माझे सगळेच माझे मित्र आहेत, असं नारायण राणे म्हणतात. हे विधान त्यांनी 2017 मध्ये काँग्रेस सोडली तेव्हा केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : भाजपने सत्तास्थापनेची जबाबदारी ज्या नेत्यांवर दिलीय त्यात नारायण राणेंचं नाव आघाडीवर आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमताचा आकडा गाठण्याचं लक्ष्य त्यांना देण्यात आलं आहे.

नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आहेत आणि त्यांचा मुलगा नितेश राणे भाजपकडून कणकवलीमधून आमदार झाले. नारायण राणे दीर्घकाळ शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होते. दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांशीच त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. काँग्रेसच्या नेत्यांसोबतही नारायण राणेंचे चांगले संबंध आहेत, असं मानलं जातं.

हे 2 सोडून बाकी सगळे मित्र

शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हे दोघं सोडले तर माझे सगळेच माझे मित्र आहेत, असं नारायण राणे म्हणतात. हे विधान त्यांनी 2017 मध्ये काँग्रेस सोडली तेव्हा केलं होतं. राणेंना राज्यसभेत जागा दिली त्याचं ऋण ते आता फेडणार, असं बोललं जातंय. शिवसेनेचा विरोध असूनही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता.

(हेही वाचा : काँग्रेसचे हे संकटमोचक नेते उद्या येणार महाराष्ट्रात?)

सगळ्या मार्गांचा वापर

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा नारायण राणे म्हणाले होते, भाजप सरकार येण्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन. सरकारस्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते करेन. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या मार्गांचा वापर करायला मला शिवसेनेनेच शिकवलं आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत आणि केवळ 40 ते 45 आमदारांचीच गरज आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. भाजपला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यातच अजित पवार गटाचे सुमारे 30 आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, असं म्हटलं जातं. हे सगळं पाहता राणेंवर सोपवलेलं ऑपरेशन यशस्वी होईल, अशी चिन्हं आहेत.

==============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 07:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading