मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाळासाहेबांना अभिवादन करताना नारायण राणे भावुक म्हणाले अखेरच्या दिवसांत...

बाळासाहेबांना अभिवादन करताना नारायण राणे भावुक म्हणाले अखेरच्या दिवसांत...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना नारायण राणे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना नारायण राणे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना नारायण राणे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक पत्र ट्विट केलं आहे.

'आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त गुरुस्मरण' असं कॅप्शन त्यांनी आपल्या या पत्राला दिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची क्षमा मागितली आहे.  बाळासाहेबांची अखेरच्या दिवसांत भेट होऊ शकली नाही म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

नारायण राणे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. 'आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त गुरुस्मरण' असं कॅप्शन त्यांनी आपल्या या पत्राला दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर माझ्या हृदयात विचारांचा कल्लोळ उठला. बाळासाहेबांच्या आठवणीने डोळ्यात आश्रू आले. सत्ता असो नाहीतर नसो बाळासाहेब ठाकरे यांना काहीही फरक पडत नव्हता.  ते आपल्या बोलण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत असं नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :  'ते आता फक्त शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख', भाजपचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला 

ठाकरे गटाला टोला 

दरम्यान यापत्रातून नारायण राणे यांनी  ठाकरे गटाला देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  आपल्याला शिवसेनेतील काही लोकांमुळे शिवसेना सोडावली लागली. बाळासाहेबांनी धर्माबाबत व राष्ट्रीय हिताबाबत कधीही तडजोड केली नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

भाजपची टीका  

आज ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक वाजता प्रकाश आंबेडकर आणि  उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा होऊ शकते, यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ज्यांना चाळीस आमदार सांभाळता आले नाही ते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती किती दिवस सांभाळतील याबाबत शंका असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Balasaheb Thackeray, BJP, Narayan rane, Shiv sena, Uddhav Thackeray