महाड, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणी नारायण राणे (narayan rane) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणे कुटुंबांसाठी आजचा दिवस अत्यंत संघर्षमय ठरला होता. दुपारी राणे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे राणेंचे संपूर्ण कुटुंबीय सोबत होते. कोर्टात राणे यांच्या पत्नी सुद्धा दाखल होत्या. राणेंना जामीन मिळाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास गोळवणीमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर राणे यांना महाड येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलं आमदार नितेश राणे आणि निलेश राणे सुद्धा हजर होते.
Hand gloves घालून अवयवांना स्पर्श केला तर तो अपराध नव्हे काय?- ऍटॉर्नी जनरल
राणेंकडून वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरी
वकिलांनी जेव्हा राणेंच्या प्रकृतीची माहिती दिली तेव्हा गोळ्या आणण्यासाठी नितेश कोर्टातून धावत गेटवर आले होते. त्यानंतर गोळ्या घेऊन परत हजर झाले होते. महाड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून राणे यांना सशर्त जामीन देण्यात आला.
कोर्टातील युक्तीवाद
- भीषण साळवी, वकील, सरकारी पक्ष : नारायण राणे यांच्या विरोधात चार FIR दाखल आहेत. महाड, पुणे, नाशिक, ठाणे.
- कलम ५०० मानहानी
- कलम ५०५(२) गैरप्रकारांकडे नेणारी विधाने
- कलम १५३ अ सामाजिक तेढ निर्माण करणे
- पुढील चौकशी करता ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी
- मुख्यमंत्री पदाची गरीमा राखली नाही
नारायण राणे यांच्या वकिलांचा युक्तीवाद
- दाखल गुन्ह्यांत ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नाही
- दाखल केलेले गुन्हे आणि अटक राजकीय द्वेषापोटी
- ७ दिवसांची कोठडी मागणे बेकायदेशीर
- नारायण राणे यांचे वय ६९
- त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे
- कलम ४१(अ) मध्ये नोटीस बजावली नाही
- कलम ५०० नुसार दाखल केलेला गुन्हा पिडीताने ( मुख्यमंत्र्यांनी) दाखल केला नसून तो अज्ञाताने दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.