मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवरायांना वंदन करून येत असताना राणेंना बसला विजेचा धक्का, LIVE VIDEO

शिवरायांना वंदन करून येत असताना राणेंना बसला विजेचा धक्का, LIVE VIDEO

विजेचा शॉक लागल्यामुळे राणेंनी लगेच पाठीमागे असलेले प्रवीण दरेकर यांना सांगितले.

विजेचा शॉक लागल्यामुळे राणेंनी लगेच पाठीमागे असलेले प्रवीण दरेकर यांना सांगितले.

विजेचा शॉक लागल्यामुळे राणेंनी लगेच पाठीमागे असलेले प्रवीण दरेकर यांना सांगितले.

  • Published by:  sachin Salve

कणकवली, 28 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची (narayan rane jan ashirwad yatra) जनआशीर्वाद यात्रा होमग्राऊंड असलेल्या कणकवलीमध्ये (kankavali) पोहोचले आहे. ठिकठिकाणी राणेंचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. पण, शहरात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खाली येत असताना अचानक नारायण राणे यांना विजेचा धक्का बसला. (Narayan Rane gets electric shock )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली होती. अटक झाल्यानंतर राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा यात्रा रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात सुरू झाली आहे. आज राणे कणकवलीमध्ये दाखल झाले आहे.

शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी राणेंच्या यात्रेचं मोठ्या उत्साहाने ढोल ताशेच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राणे खाली येत होते. त्यावेळी रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रेलिंगचा आधार घेत राणे पुढे चालले होते. अचानक एका ठिकाणी विजेचा जोरदार धक्का लागला. विजेचा धक्का बसल्यामुळे राणेंच्या हाताला चांगलाच झटका बसला.

मुंबईच्या युवराजनं उंचावली देशाची मान! जगातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड

विजेचा शॉक लागल्यामुळे राणेंनी लगेच पाठीमागे असलेले प्रवीण दरेकर यांना सांगितले. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर तातडीने उघडी पडलेली विजेची वायर जोडण्यात आली. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

First published: