रायगड, 25 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (Cm Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे (narayan rane) यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची (Police) मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे.
केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
'सत्यमेव जयते' असं दोन शब्दांचं ट्वीट राणेंनी रात्री 12.32 च्या सुमारास केलं आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
दुसरीकडे राणेंनी मोजक्याच शब्दात ट्वीट केलं असेल तर त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला डिवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्वीट करत त्यांनी पुन्हा शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीच्या एका सिनेमातील सीन शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे चॅलेज दिलं आहे.
नारायण राणेंना जामीन
नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
Narayan Rane Arrest : भविष्यात पुन्हा असं होणार नाही, राणेंची कोर्टात ग्वाही
राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.