मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सुडाचं राजकारण; महाविकास आघाडी सरकारकडून नितेश राणेंना अडकवण्याचं षडयंत्र: नारायण राणे

सुडाचं राजकारण; महाविकास आघाडी सरकारकडून नितेश राणेंना अडकवण्याचं षडयंत्र: नारायण राणे

नारायण राणे (narayan rane) यांनी मुलावर होत असलेल्या आरोपावरून महाविकास आघाडी सरकारला (mva government) इशारा दिला आहे.

नारायण राणे (narayan rane) यांनी मुलावर होत असलेल्या आरोपावरून महाविकास आघाडी सरकारला (mva government) इशारा दिला आहे.

नारायण राणे (narayan rane) यांनी मुलावर होत असलेल्या आरोपावरून महाविकास आघाडी सरकारला (mva government) इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग, 27 डिसेंबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

कणकवली येथील एका कार्यकर्त्यांच्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसंच सत्तेचा गैरवापर सूडबुद्धीने केला जात असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा- Year Ender 2021 : यावर्षी Rohit Sharma साठी या गोष्टी ठरल्या लकी, पाहा 2021 मधील परफेक्ट PHOTOS

दरम्यान अशा प्रकारचे अटकसत्र सुरू राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार हे बळाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहे. या बळाचा गैरवापर करुन ते नाहक प्रकरणात आमदार नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, पोलिसांनी लक्षात ठेवा केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

नितेश राणेंचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election 2021) कणकवलीत शिवसैनिक संतोष परब प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे नेते मला गोवण्याचा डाव रचला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

'सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून उत्साहवर्धक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मला संतोष परब हल्ल्यातील केसमध्ये गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या हल्ल्याबाबत सुरू असलेल्या चौकशीवरून मला या गुन्ह्यात अडकवत असल्याचे दिसून येत आहे' असा दावाच राणेंनी केला आहे.

हेही वाचा-  230 दिवस शरीरात राहतो Corona Virus?, 'या' अवयवांवर करतो परिणाम; अमेरिकेत संशोधन

तसंच, ज्याप्रमाणे मागील 2 वर्षे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चुकीच्या केस टाकल्या जात आहेत तसाच अनुभव मलाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत येत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Narayan rane, Nitesh rane