23 फेब्रुवारी : सध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दा गाजत असतानाच आता नारायण राणे यांनीही पवार यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. आरक्षणाबाबतचा प्रश्न शरद पवारांनी आताच का उपस्थित केला, याचा विचार व्हायला हवा. असा उलटा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. नारायण राणे यांच्या या प्रश्नांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणारची शक्यता आहे.
याआधी शरद पवारांनी आर्थिक निकषाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत आताच का चर्चा होतेय असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आता जे आरक्षण लागू आहे त्या समाजाची आर्थिक परिस्थिती बघूनच ते देण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण हे शैक्षणिक, आर्थिक निकषाच्या आधारावरच मागतोय. पवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी सांगाव. असंही राणे म्हणाले.
राजकारणात पवारांसारखं कुठलं दुसरं व्यक्तीमत्व मी पाहिलं नाही. कालची मुलाखत ही ऐतिहासिक आहे. कालची मुलाखत ही स्वच्छ कपड्यातली स्पष्ट मुलाखत आहे. असंही म्हणत त्यांनी मुलाखतीबाबत आपलं मतही व्यक्त केलं.
नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा पवारांना अधिकार आहे. ते मोदींचे गुरू आहे. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. पण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ज्या पध्दतीने आर्थिक निकषाच्या भाषा आली. ही अपेक्षा पवारांकडून नव्हती. भाजपला स्वतःची प्रतिष्ठा राखायची असेल तर त्यांनी अधिवेशनापूर्वी निर्णय घ्यावा. माझं भविष्य काही खरं ठरत नाही. त्यामुळे मी भविष्य सांगू शकत नाही. असंही राणे म्हणाले.
राणेंच्या या प्रश्नांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह दिसतायत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Narayan rane, Raj thackrey, Sharad pawar